माध्यमिक शिक्षक सोसायटीची बेकायदेशीर नोकर भरती रद्द करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माध्यमिक शिक्षक सोसायटीला चुकीच्या सेवक आकृतिबंधास दिलेली मंजुरी रद्द करून, सोसायटीने सुरू केलेली बेकायदेशीर नोकर भरती तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी विरोधी संचालक व परिवर्तन मंडळाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 


या आंदोलनात संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, अंबादास राजळे आदींसह मारुती लांडगे, संभाजी गाडे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, प्रशांत होन, अजय आव्हाड, शिरीष टेकाडे, अर्जुन भुजबळ, नामदेव ससे, धोंडीभाऊ कोल्हे, अमोल दहातोंडे, रोशन सरोदे, प्रवीण कार्ले, रमाकांत दरेकर, मंगेश काळे, महेश दरेकर, संभाजी पवार, नंदकुमार शितोळे आदींसह परिवर्तन मंडळाचे सदस्य तथा सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने नोकर भरती करण्याकरिता सेवकांचा सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास दिला आहे. 

सदर चुकीच्या आकृतीबंधास मंजुरी न मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र संस्थेची सभासद संख्या व सेवा नियमांचा विचार न करता चुकीचे आकृतीबंधास केवळ आर्थिक गैरव्यवहार बेकायदेशीरपणे मंजुरी दिलेली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

संस्थेचे सत्ताधारी संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता दि.30 सप्टेंबर च्या मिटिंगमध्ये लिपिक व शिपाई पदाची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन बेकायदेशीरपणे नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. 

सत्ताधार्‍यांचे हे कृत्य संस्थेच्या हितास बाधा आनणारे असून, यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होऊन बदनामी होणार आहे. सदरचा आकृतिबंध रद्द करून संस्थेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने सुरू केलेली बेकायदेशीर नोकरभरती त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना देण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.