महिलेवरील अत्याचारप्रकरणी नराधमाला सात वर्ष सश्रम कारवास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी दोषी ठरवत जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी आरोपी कुमार उर्फ कुम्या उर्फ उमेश रविंद्र शिरसाट (रा. पिंपळगावरोठा, ता. पारनेर) याला सात वर्ष सश्रम कारवास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 
Loading...

याबाबत अधिक माहिती अशी, पिडित महिला कोरठाण खंडोबा देवस्थानच्या झाडांमध्ये गवत काढण्याचे काम करत असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १२ ऑगस्ट २०१४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली होती. 

तुझा नवरा अपंग आहे, तो माझे काहीच वाकडे करू शकत नाही. याबाबत कोणाला काही सांगितले, तर तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत पिडित महिलेला मारहाण देखील केली होती.याप्रकरणी पिडित महिलेने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

तत्कालिन पोलिस निरीक्षक एस. आर. जांभळे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे पिडित महिला, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिनी शेळके, अंमलदार कुंडलीक आरवडे, तपासी अधिकारी जांभळे यांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदवण्यात आल्या.

अारोपीने पिडित महिलेवर केलेला अत्याचार, परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी, अत्याचाराबाबतचा वैद्यकीय पुरावा व सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.