शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्याने सास­ऱ्याचा सुनेवर धारदार शस्त्राने हल्ला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील केलवड येथे शरीरसुखाची मागणी पूर्ण केली नाही, म्हणून चुलत सासऱ्याने सुनेवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. नंतर स्वत: विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 


ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यातील महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवरही लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Loading...
याबाबत जखमी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी आरोपी नानासाहेब देवराम गोर्डे (४५) याने महिला घरात एकटी असतांना तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व शारिरीक सुखाची मागणी केली. याला महिलेने नकार दिला. 

म्हणून आरोपी नानासाहेब गोर्डे याने महिलच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर कुऱ्हाडी सारख्या धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.