पैज जिंकण्यासाठी वर्गात जाऊन मुलाने घेतले विद्यार्थिनीचे चुंबन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पाथर्डीत शाळाबाह्य मुलाने पैज जिंकण्यासाठी वर्गात जाऊन विद्यार्थिनीचे चुंबन घेतले. हा प्रकार तालुक्यातील भालगाव येथील शाळेत गुरुवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी पालकांनी शुक्रवारी शाळेत येत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. गावातील टारगट व रोमिओगिरी करत फिरणाऱ्या टग्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थिनीची छेड करण्याची पैज लावली होती. 
Loading...

अशा गुंड प्रवृत्तींमुळे भालगाव व परिसरात मुलींच्या पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. भालगाव शाळेच्या मैदानाजवळील ओट्यावर गावातील रोडरोमिओ मुलांचे टोळके बसले होते. त्यांच्यामध्ये वर्गात जाऊन मुलीचे चुंबन घेण्याची पैज ठरली.

या टोळक्यातील एका उनाड मुलाने शाळेतील वर्गात जात मुलामुलींसमोर एका मुलीचे जबरदस्तीने चुुंबन घेतले. या वेळी उपस्थित असणाऱ्या काही विद्यार्थिनींनी हा प्रकार शिक्षक व मुख्याध्यापकांना सांगितला. मुलीच्या चारित्र्याचा विषय असल्याने वाच्यता नको म्हणून पालकांनी आम्ही आमच्या पातळीवर पाहू, तक्रार द्यायची नाही, असे सांगितले.

शाळा सुटल्यानंतर पालकापर्यंत या विषयाची चर्चा पोहोचली. पालकांनी अत्याचारग्रस्त मुलीच्या पालकाला धीर देत शाळेत जात मुख्याध्यापकांना धारेवर धरले. शाळेच्या वेळेत गावातील कोणीही येईल मुलीची छेड काढेल, अशी मनमानी चालणार नाही. आपण काय करता शाळेत हा प्रकार घडल्याने शाळेच्या वतीने पोलिसात फिर्याद दाखल करा; अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला.

यापूर्वीही या शाळेतील मुली उनाड मुलांच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. काही मुलींनी, तर मुलांच्या छेडछाडीमुळे शाळा सोडल्या आहेत. शाळेच्या मैदानात यापूर्वीही छेडछाडीचे प्रकार घडूनही आतापर्यंत शाळेनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

त्यामुळे गावातील गुंड व उनाड मुलांची हिंमत वाढली आहे. शालेय विद्यार्थिनी छेडछाड व अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. या शाळेला संरक्षण भिंत नाही, शौचालय नाही, प्रवेशद्वार नाही, शिक्षकही वेळेवर शाळेत येत नाहीत. अशा अनेक तक्रारी या वेळी ग्रामस्थांनी केल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.