पैशासाठी मुला-मुलींनी आईचा केला स्वतंत्र दशक्रिया विधी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पैशामुळे नाती दुरावतात, याची अाणखी एक उदाहरण नाशिक जिल्ह्यात समाेर अाले अाहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पात संपादित जमिनीचा लाखोंचा मोबदला व वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यासाठी बहिण- भावात वित्तुष्ट अाले. याच वादातून त्यांनी मृत अाईचा चक्क वेगवेगळा दशक्रिया केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील धामणगावात घडली.
Loading...


इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतजमीन मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गासाठी शासनाने खरेदी केली आहे. याच शिवारातील गंभीरवाडी येथील नाना सोमा नाडेकर या वृद्धाची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. यातील काही जमीन मुलगा बंडू नाडेकरच्या नावाने आहे. 

यातील काही जमीन समृद्धी महामार्गासाठी गेल्याने त्याचा मोबदला मुलाला मिळाला आहे. मात्र, ही जमीन वडिलोपार्जित असल्याने या मोबदल्याचे आम्हीही वारसदार असल्याचा हक्क दाखवत त्याच्या बहिणींनी मोबदला मागण्यास सुरुवात केली. अनेकदा मागणी करूनही बंडू यांनी मोबदला देण्यास नकार दिला होता. 


दरम्यान, जन्मदात्या आई-वडिलांना विभक्त ठेवल्याने या बहिणींनी त्यांच्याशी अनेकदा वादही घातला होता. अशातच नाना यांच्या पत्नी जयवंताबाई यांचे २७ सप्टेंबर रोजी निधन झाले. शनिवारी नाना यांनी मुलींना सोबत घेऊन दशक्रिया विधी केला, तर बंडूनेही स्वतंत्रपणे दशक्रिया विधी केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.