आत्महत्या थांबविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळ व सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालय आणि सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तणावमुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांचे वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे देण्यात आले. या शिबीरात विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या या विषयावर जनजागृती वर पथनाट्य सादर करण्यात आले. 


प्रा.गिरीश कुकरेजा यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवन आणि परीक्षेच्या काळातील ताणतणाव दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्राध्यापक जाधव सर यांनी मुलांना परीक्षेच्या वेळी असलेला ताण दूर करण्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सन फार्मा विद्यालयाचे प्राचार्य उगले सर, प्रा.निकम सर, श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळ या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख, प्रकल्प व्यवस्थापक प्रतिभा तळेकर, सीएसआरडी महाविद्यालयाचे विद्यार्थी आकाश शिंदे, अक्षय जेजुरकर, शांती वेलपुल्ला, शितल कांबळे, रोहिणी कोरडे, अश्‍विनी पाखरे, सर्व शालेय शिक्षक व अमृतवाहिनी संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.