श्रीगोंद्यात सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडीच्या अश्विनी श्रीमंत घोडके वय २० या विवाहितेने माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी सासरी सतत छळ होत असल्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. 

Loading...
अशोक आबाजी घोडके (सासरा), कमल अशोक घोडके (सासू), श्रीमंत अशोक घोडके (पती), दत्ता अशोक घोडके (भाया) ज्योती दत्ता घोडके (जाऊ) सर्व रा.महांडूळवाडी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मे २०१८ मध्ये रावसाहेब घायमुक्ते यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह श्रीमंत यांच्याशी झाला. काही दिवस सुखाने प्रपंच सुरु होता. त्याचदरम्यान श्रीमंत घोडके यांना घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधण्यासाठी माहेरहुन ५० हजार रुपये आणावेत. अशी अश्विनीकडे पैशाची मागणी सुरु झाली.

आश्विनी हिने माहेरी जावून आपला छळ होत असल्याचे सांगितले. अश्विनीच्या वडिलांनी काही दिवसांच्या मुदतीनंतर ५० हजार रुपये नेऊन दिले. पैसे देउनही अश्विनीचा छळ थांबला नाही.काही दिवस गेल्यानंतर दुचाकीचे हप्ते भरण्यासाठी २५ हजार आणावेत यासाठी तिचा छळ सुरु झाला.

लाथाबुक्यानी मारहाण करण्यात आली. सतत होणाऱ्या मारहाणीने अश्विनी त्रस्त झाली होती. दि.३ ऑक्टोबर रोजी तिने विषारी औषध प्राशन केले. घरच्या मंडळीनी तिला उपचारासाठी नगर येथे दाखल केले मात्र उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.