अपघातात जखमी तरूणाची प्राणज्योत मालविली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अपघात झाला...डोक्याला जबर मार ही लागला. औषधोपचारासाठी पुण्याला नेण्यात आले दोन महिने औषधोपचार चालू होते. पण नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते आणि सकाळी आठ वाजता निवृत्ती दौलत गाडेकर (वय-२७) या तरुणाची प्राणज्योत मालवली. 
Loading...

त्यामुळे संगमनेर तालुक्यातील बोरबन गावावर दु:खाचे सावट पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, बोरबन याठिकाणी निवृत्ती गाडेकर हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. तो घरातील सर्वांचा लाडका होता. दोन महिन्यांपूर्वीच बोरबन परिसरात निवृत्तीचा अपघातात झाला होता.

 या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे औषधोपचारासाठी त्याला संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण निवृत्तीच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता. त्यामुळे डॉक्टारांनी त्याला पुणे याठिकाणी नेण्यास सांगितले. 

जवळपास दोन महिने निवृत्ती हा मृत्यूशी झुंज देत होता. पण शेवटी नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते दोन महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या निवृत्ती या तरुणाची सोमवारी सकाळी प्राणज्योत मालवली. त्याच्या जाण्याने बोरबन गावावर दु:खाचे सावट पसरले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.