सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तर दुष्काळग्रस्त भागाला नक्कीच पाणी मिळेल - खा. सदाशिव लोखंडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एकमेकांवर टिका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले आहे. येत्या ९ ऑक्टोबरला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 
Loading...

या बैठकीसाठी निळवंडे लाभक्षेत्रातील सर्वच लोकप्रतिनिधींना निमंत्रीत केले असल्याचेही खा.लोखंडे यांनी सांगितले. प्रकल्पासाठी पैशांची कोणतीही अडचण नाही, मात्र कामांची गती वाढवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तर येत्या दोन वर्षात दुष्काळग्रस्त भागाला नक्कीच पाणी मिळेल असे खा.लोखंडे यांनी सांगितले.. 

खा.सदाशिव लोखंडे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने ही बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसुल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ. वैभव पिचड, आ. स्नेहलता कोल्हे, आ. शिवाजीराव कर्डीले, आ.राजाभाऊ वाजे यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. 

निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे केंद्राच्या बळीराजा कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून नाबार्डचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या संदर्भातील अहवालही केंद्रात दाखल झाला आहे. राज्य सरकार देखील २५ टक्के वाटा उचलणार आहे. त्यामुळे आता कालव्यांची कामे जलदगतीने पूर्ण होण्यासाठी गरज आहे. ती राजकीय इच्छाशक्तीची. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही कामे लवकरात लवकर कसे पुर्ण होतील याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत खा. लोखंडे यांनी व्यक्त केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.