शेवगावात वीज पडून दोन शेतमजूर ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तालुक्यातील आखेगाव येथे वीज पडून दोन शेतमजूर ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान डोंगर आखेगांव शिवारात शेवगांव रस्त्यानजिक घडली. जनार्दन दामोधर खर्चन (६० ) व दादासाहेब चंद्रभान पायघन (५३) असे मृतांचे नावे आहेत. 
Loading...

खर्चन व पायघन हे आखेगाव - शेवगाव रस्त्याशेजारील रविंद्र काशिनाथ भागवत गट नं १६७ या शिवारात शेतामध्ये पाळी घालीत होते. विजांसह आलेल्या वादळी पावसामुळे ते एका लिंबाच्या झाडाखाली आडोशाला उभे राहिले असता झाडावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

रात्री उशिरा फक्त बैलच घरी आल्याने घरच्यांनी व गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली असता ते लिंबाच्या झाडाखाली मृतावस्थेत तेथे सापडले. खर्चन यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे तर पायघन यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, जावई नातवडे असा परीवार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.