पारनेर तालुक्यात घरातून सव्वा लाखांची चोरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पारनेर तालुक्यातील सुपा (जांभुळवाडी) येथील माऊली कृपा सोसायटीतील बंद घराचा दरवाज़ा तोडून चोरटयांनी कपाटातील रोख ६ हजार रुपये, १ लाख १७ हजार किमतीचे सोन्याचे दागिने व ७ हजार रुपये किमतीचा ओनिडा किमतीचा टीव्ही, असा एकूण १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. 

Loading...
याप्रकरणी नितीन बबन पवार यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. बबन पवार (मूळ गाव उखलगाव, ता. श्रीगोंदा, हे भाडेकरू म्हणून राहतात. ते सुपा एमआडीसीतील एका कंपनीत कार्यरत आहेत. दि.३ रोजी ते कुटुंबासह आपल्या मूळ गावी गेले असता, दि.३ रोजी रात्री ८.३० ते दि.४ रोजी सकाळी ७ वाजेचे दरम्यान त्यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश केला व कपाटातील ६ हजार रोख, १ लाख १७ हजार किमतीचे सोन्याचे दागिने व ७ हजार रुपये किमतीचा ओनिडा किमतीचा टीव्ही, असा एकूण १ लाख ३० हजार किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पवार यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.