पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्लात सहा जण जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहुरी धानोरे परिसरातील नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला  करत सहा नागरिक व एका गायीला चावा घेऊन जखमी केले. जखमी नागरिकांना पुढील उपचारासाठी नगर येथील शासकिय रुग्णालयात, तर एकास पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले आहे. 


मागील आठवड्यात राजेंद्र दगडू दिघे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर कुत्र्यांनी हल्ला करत जखमी केले. गायत्री कुलकर्णी हिलाही या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच आठ दिवसाच्या कालखंडात याच पिसाळलेल्या कुत्र्यांचा कळप पुन्हा सक्रिय होत, त्यांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धानोरे गावठाण परिसरात नागरिकांवर हल्ला केला. 
Loading...

या हल्ल्यात तुकाराम मोरे (अनापवाडी), विनोद पवार, भास्कर अंत्रे, विजय अंत्रे व सदिच्छा कडनोर (सर्व रा. सोनगाव) या नागरिकांच्या हातापायाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ उपचारासाठी प्रथम लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात व नंतर अहमदनगर येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. 

तेथून सदिच्छा कडनोर या शालेय विद्यार्थिनीला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथील सरकारी रुग्णालयात रेबिज प्रतिबंधक लस उपलब्ध करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.