साईमंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी आता होणार ड्रोनचा वापर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वर्षभरात शिर्डीला तीन कोटींच्या आसपास भाविक भेट देऊन साईसमाधीचे दर्शन घेतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस, सुरक्षारक्षकांबरोबरच आता ड्रोनने लक्ष ठेवण्यात येणार आहे.यासाठी संस्थानकडून लवकरच चाचणी घेतली जाणार आहे.  
Loading...

साईबाबांच्या दर्शनासाठी दिवसागणिक भाविक वाढत असून देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही साईभक्त मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. त्यानुसार साईमंदिर सुरक्षेची यंत्रणाही अलर्ट झाली आहे. संस्थानला एका साईभक्ताने सुरक्षेसाठी ड्रोन भेट दिला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.