ट्रकच्या चाकाचे व्हील चोरणाऱ्यास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्टेशनरोडवरील मल्हार चौकाजवळील गाडे ट्रान्सपोर्टच्या कंपाऊंडमध्ये उभ्या केलेल्या मालट्रकच्या चाकाचे व्हील चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षय मारूती कुंभारी (हॉटेल यशग्रॅंडमागे, कायनेटिक चौक) हा हॉटेल यश ग्रॅंड येथे नोकरीस असून त्यांना बुधवारी रात्री कामावर असताना हॉटेललगत असलेल्या गाडे ट्रान्सपोर्टच्या कंपाऊंडमध्ये लावलेल्या मालट्रकच्या चाकाचे व्हील काढून चोरी करण्याचा प्रयत्न करताना एक चोरटा दिसून आला. 

कुंभारे व त्याच्या सहकाऱ्यांनी त्या चोरट्यास पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. महादेव रंगनाथ काळे (रा. दशमीगव्हाण, ता.नगर) असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध अक्षय कुंभारे याच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.