स्वाईन फ्लू सदृश आजाराने नेवासे तालुक्‍यातील एकाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्‍यातील म्हाळस पिंपळगाव येथील एका व्यक्तीचा स्वाईन प्लू सदृश आजाराने उपचारादरम्यान पुणे येथे दवाखान्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Loading...
या व्यक्तीस काही दिवसांपुर्वी सर्दी ताप येवू लागल्याने नेवासे फाटा येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर स्वाईन फ्लू सदृश आजाराचे उपचार केले. त्यांचा आजार आटोक्‍यात येत नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्याचा सल्ला दिला. पुणे येथे उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.