खा.सुप्रिया सुळेंच्या सभेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित मेळाव्यात खा. सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना च अंगावर रॉकेल ओतून एका शेतकऱ्याने अगस्ती कारखान्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.


Loading...
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी अकोले शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी खा. सुळे यांचे भाषण सुरू असताना अगस्ती कारखान्याच्या उभारणीत शेतजमिन जावूनही मोबदला न मिळाल्याचा आरोप करीत शेतकरी दत्तात्रय शेणकर यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकांनी व काही कार्यकर्त्यांनी शेणकर यांना बाजूला ढकलत नेऊन पेटवून घेण्यापासून रोखले.

याप्रकरणी अगस्ति कारखाना निर्मितीत गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून गोंधळ केल्याप्रकरणी अकोले येथील दत्तात्रय नामदेव शेणकर याचेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.