महिलांसाठी तीन दिवसीय विविध आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लायन्स प्राईड, लायनेस मिडटाऊन व वधवाज केअर अ‍ॅण्डि क्युअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित तीन दिवसीय विविध आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन लायन्सचे रिजन चेअरपर्सन महेश पाटील यांच्या हस्ते झाले. 


यावेळी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अमित बडवे, संतोष मानकेश्‍वर, मनिषकौर वधवा, डॉ.नेहा जाजू, क्लबचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, नरेंद्र बोठे, निलीमा परदेशी, संदेश कटारिया, अंजली कुलकर्णी, डॉ.सिमरन वधवा, रेखा पानपाटील, डॉ.प्रिती थोरात, डॉ.कल्पना गायकवाड, सुनंदा तांबे, शर्मिला कदम, गगनकौर वधवा आदि उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत हरजितसिंग वधवा यांनी केले. 

प्रास्ताविकात डॉ.सिमरन वधवा यांनी महिला कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना आरोग्याची काळजी घेत नाही. एखादा आजार झाल्यास लवकर दवाखाण्यात देखील येत नाही. या शिबीराच्या माध्यमातून महिलांच्या सर्व तपासण्या करुन त्यांना उपचार केले जात आहे. या शिबीराचे 7 वे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. 

महेश पाटील म्हणाले की, महिलांचे आरोग्य चांगले असले तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहू शकते. कुटुंबाचा गाडा चालवत असताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.अमित बडवे यांनी महिलांनी महिलांच्या आरोग्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या शिबीराचे हे 7 वे वर्ष असून, याचा फायदा सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.