बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या.


बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्यम विजय माळी असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास प्रोफेसर कॉलनी चौकातील मयुर काॅम्प्लेक्स परिसरात घडली. या घटनेने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

Loading...
सत्यम हा सारडा महाविद्यालयात बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. सत्यम हा महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी पुढे असायचा. त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता.

ढोल पथकात देखील तो सक्रिय होता. नेहमी उत्साही असणाऱ्या सत्यमच्या आत्महत्येचे वृत्त ऐकताच त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरी कुणी नसताना त्याने आपले जीवन संपवले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.