अभिनेत्री तनुश्री दत्तावर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केल्याने अभिनेत्री तनुश्री दत्ता अडचणीत सापडली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या तक्रारीवरून तिच्यावर केज ठाण्यात बुधवारी (दि. ३) अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


हिंदी चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने २७ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने मनसे पक्षाचा उल्लेख गुंडाची पार्टी असा केला तर राज ठाकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

Loading...
बुधवारी यासंदर्भातील व्हिडिओ चित्रफीत सोशल माध्यमांद्वारे मोबाईलवर आली. त्यातून मनसेप्रमुख राज ठाकरे व मनसे कार्यकर्त्यांची बदनामी झाल्याचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तक्रारीत म्हटले आहे. धस यांच्या तक्रारीवरून केज पोलिसांनी भादंविचे कलम ५०० अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.