गटारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील नांदुर्खी केलवड रोड लगत असलेल्या साईड गटारात बेवारस अवस्थेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
Loading...

याबाबतचे वृत्त असे की, केलवड येथे मंगळवारी सकाळी केलवड नांदुर्खी रस्त्यालगतच्या साईड गटारात एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. सफेद रंगाचे बनियन व निळ्या रंगाची अन्डर पॅन्ट मयताचे अंगात होती.

मयत व्यक्ती हा दिवसभर केलवड गावात फिरत होती. मयत व्यक्ती हा परप्रांतीय नागरीक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गावचे कामगार पोलीस पाटील सुरेश आप्पाजी गमे यांनी या घटनेविषयी पोलीसांत खबर दिल्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.