श्रीगोंदा मतदारसंघात चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकासकामे - आ. राहुल जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राजकारण जरूर करावे परंतु विकास कामात कुठलेही प्रकारचे राजकारण करू नये असे आवाहन आमदार राहुल जगताप यांनी केले. नगर तालुक्यातील वाळकी (कासारमळा) येथील भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
Loading...

आ. जगताप पुढे म्हणाले की, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षांपासून आपण मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. त्यात राजकारण कधीही आणले नाही व यापुढेही आणणार नाही. वाळकीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. वाळकीकरांनी नेहमीच आपल्या मनापासून प्रेम केले. राजकारणापेक्षा आपण मैत्रीला जास्त महत्त्व देतो.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.