अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऊसतोड करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन आरोपी कोंडीराम उर्फ भाऊराव मारुती सानप (रा. महालक्ष्मी हिवरे, ता.नेवासा) याला दोषी धरुन सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. ए.बी.पवार यांनी काम पाहिले.
Loading...

राहुरी विद्यापीठ परिसरात मुलगी व तिचे कुटुंब कोपीत झोपले होते. आरोपीने मुलीला बळजबरीने बाहेर बाेलावून व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तिचे अपहरण केले. २६ डिसेंबर २०१६ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.


साक्षी पुरावा व कागदोपत्री पुराव ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले. घटनेच्या वेळी मुलगी पंधरा वर्षांची होती. परंतु ती शाळेत शिकलेली नसल्याने तिच्या जन्माबाबतचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आरोपीला बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत दोषी धरले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.