शहराचा विकास करून चेहरा आम्हीच बदलू शकतो : खा. दिलीप गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सरकारकडे पैशांची कमतरता नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आता झपाट्याने शहरात विकास कामे होणार आहेत. बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू होत आहे. 

Loading...
या पुलाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण देण्यासाठी व नगर शहरासाठी आणखी निधी मागण्यासाठी मी दिल्लीला जात आहे. शहराचा विकास करून चेहरा आम्हीच बदलू शकतो, प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.

रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील माजी बांधकाम सभापती सूर्यकांत ऊर्फ ठकन खैरे, विशाल खैरे व सुरेखा खैरे यांनी परिसरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खासदार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मल्हार चौक येथे झालेल्या सभेत हा पक्षप्रवेश झाला.


पाचपुते म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये याआधी अनेक खासदार झाले, पण खासदार निधीतून विकास कामे काय असतात हे फक्त भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनीच दाखवून दिले आहे.

सुवेंद्र गांधी म्हणाले, महानगरपालिकेत भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांचे महापौर व सत्ता नागरिकांनी अनुभवले आहेत. मात्र, अजून सर्व नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सर्व भागांमध्ये नागरिकांची हेळसांड होत असल्याने सत्ताधारी मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ आहेत. या प्रभागाचा समावेश गाजलेल्या पथदिवे घोटाळ्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व शिवसेनेने अनेक भ्रष्टाचार करत बोगस कामे केली आहेत

या वेळी माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सरचिटणीस किशोर बोरा, बाळासाहेब महाडिक, गटनेते सुवेंद्र गांधी, माजी नगरसेवक श्रीकांत साठे, सुनील काळे, सुरेश गायकवाड, चंद्रकांत पाटोळे, प्रितेश गुगळे, सुधाकर डांगळे, सागर कराळे, नारायण साळवे, विलास उबाळे, गीतांजली औसरकर आदी उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.