श्रीगोंद्यात सरपणावरून झालेल्या वादातून महिलेचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी कोठार गावात घरासमोरून सरपण चोरून नेल्याचा जाब विचारल्याने झालेल्या वादातून लीलाबाई सयाजी कांबळे (वय ६५) या महिलेला शेजारचे प्रवीण शिंदे, मयूर ऊर्फ बंडू शिंदे, वंदना शिंदे यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान २१ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला.

Loading...
याबाबत रामदास कांबळे यांच्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ९ ऑक्टोबरला मारहाणीची ही घटना घडली होती. जखमी लीलाबाई यांना त्यांचा मुलगा रामदासने श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात आणले.

गंभीर इजा असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याविषयी सांगण्यात आले. त्यांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लीलाबाईंना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान लीलाबाईंचे निधन झाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.