अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ब्राह्मणी (ता. राहुरी) येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ३०) हा ब्राह्मणीचा आठवडा बाजार असतो. हा बाजार सर्वसाधारण सायंकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत चालतो. याच बाजारतळाजवळ अंदाजे ५० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आठ वाजेच्या सुमारास आढळला.


Loading...
यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या अंगात पायजमा, बनियन आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. परंतु, मयत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.