पोलीस अधिकार्‍याकडून कुटुंबीयांना मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस अधिकार्‍याच्या जागेची देखभालकरीता कामावर असलेल्या मागासवर्गीय शेंडगे कुटुंबीयांनी कामाचे पैसे मागीतल्याचा राग येऊन सदर पोलीस अधिकार्‍याने शेंडगे कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत, राहती खोली खाली करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यास धमकाविले. या पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया उपोषण सुरु करण्यात आले आहे. 
Loading...

मीना विलास शेंडगे हे मागासवर्गीय कुटुंब सन 2010 सालापासून पोलीस अधिकारी असलेले मच्छिंद्र बोडखे यांच्या गुलमोहर रोड येथील जागेच्या देखभालासाठी कामावर होते. जागेच्या देखभालीसाठी 5 हजार रुपये महिना ठरला असताना सन 2010 पासून 2018 पर्यन्त 8 वर्षाची मजुरी त्यांना देण्यात आलेला नाही. 

कामाचे पैसे मागीतल्याचा राग येऊन बोडखे व त्यांचे मेव्हणे बाबासाहेब खेडकर यांनी शेंडगे कुटुंबियास मारहाण केली. तर खोली खाली करण्यासाठी जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल नसताना देखील शेंडगे दांम्पत्यांना दि.2 ऑक्टोबर रोजी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दिवसभर बसवून ठेवले. 

या संदर्भात तक्रार करुन एक महिना उलटला तरी संबंधीतांवर कारवाई केली जात नाही. पोलीस असल्याचा गैरफायदा घेणार्‍याला तोफखाना पोलीस स्टेशन अभय देत आहे. ज्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा आहे त्यांच्याकडूनच अन्याय होत असल्याचा आरोप शेंडगे कुटुंबीयांनी केला आहे. 

मारहाण करणार्‍यांवर कारवाई करुन त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, तसेच पोलीस असल्याचा गैरफायदा घेणार्‍या बोडखे यांचे निलंबन करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.