...तर सुजय विखे पाटील अपक्ष लढणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- १५ वर्षांपासून जे खासदार आहेत, त्यांना तुम्ही ओळखता का? निवडणूका आल्या की त्यांचे मतांसाठी दौरे सुरू होतात. मात्र, आत्तापर्यंत दक्षिणेचा कसलाही विकास झालेला नाही. यामुळे जनता भाजपवर नाराज आहे. त्यामुळे वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढेल. मात्र, भाजपसोबत जाणार नाही, असे  सुजय विखे म्हणाले.

Loading...
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.

खासदार, आमदारांनी केले काय?
डॉ. विखे म्हणाले की, 'मागील चार दिवसांपासून या भागातील गावांमध्ये जात आहे. सर्वच ठिकाणी प्रश्न सारखे आहेत. मग १५ वर्षांपासून निवडूण गेलेल्या खासदार, आमदारांनी केले काय? असा प्रश्न होतो. केवळ निवडणुकिपुरती ही माणसे तुमच्याकडे आली. कर्जत जामखेडच्या विकासासाठी पालकमंत्री फक्त कोट्यवधींची घोषणा करतात. विकास मात्र कोठे दिसत नाही.

योजनांच्‍या फक्त फसव्या घोषणा !
भाजप सरकार हे फक्त योजनांच्‍या फसव्या घोषणा करत आहे. अंमलबजावणी मात्र, कुठेही होताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या घोषणा आहेत. त्या २०२२ पर्यंत पूर्ण करणार, असे सांगितले जाते. त्यावरच येणाऱ्या निवडणुकीत पोळी भाजायचा इरादा या सरकारचा आहे.

१५ वर्षात कधी खासदार पाहिला आहे का?
'खासदार व पालकमंत्रीपद १५ वर्षांपासून नगर दक्षिणेत आहे. तरी देखील दक्षिण भागात पाण्यापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या समस्या कायम आहेत. १५ वर्षात कधी खासदार पाहिला आहे का? ही परिस्थिती बदलायची आहे. त्यामुळे नगर जिल्हा भाजपमुक्त करणार आहे,' असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.