शिर्डी संस्थानमध्ये 82 लाखांचा गैरव्यवहार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिर्डी संस्थानमार्फत पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या चांदीच्या नाण्याचे वितरण करण्यात आले. मात्र चांदीच्या सध्याच्या दरानुसार या २५ ग्रॅमच्या नाण्याची किंमत १ हजार रुपये होत असताना संस्थानने ते १,८२५ रुपयांना खरेदी केल्याचे दाखविले आहे. 
Loading...

१० हजार नाणी खरेदी करतानात त्यात ८२ लाख ५० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आणि साईभक्तांची लुबाडणूक झाल्याचा आरोप माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केला आहे. याबाबतची तक्रार न्याय विधी खात्याकडे करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

तत्कालीन विश्वस्तांमध्ये साई प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे हे होते. त्यांनी त्यांच्या पतसंस्थेच्या सभासदांसाठी १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून दिले. ते एक नाणे सर्व करांसहित ४१३ रुपयास पडते, त्यामुळे २५ ग्रॅमसाठी १ हजार रुपयेच द्यावेत. संस्थानने जास्त रकमेला नाणी खरेदी केल्याचे त्यावरून स्पष्ट होते, अशी माहिती माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.