राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांकडून जीवे मारण्याची धमकी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील जामगाव येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी एकास बेदम मारहाण करून गोळी घालून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात उपाध्यक्ष माळीसह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

Loading...
जामगाव येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, त्यानंतर वाद उफाळला. यात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी सभासद दिलिप कुंडलिक नाईक यांना मारहाण केली.

सभासदांना अजेंडा मिळाला नाही, त्यामुळे पुन्हा सभा घ्यावी, असे नाईक यांनी सचिव विनायक रोहोकले यांना सांगितले. सभेत चर्चा सुरु असताना गोंधळ उडाला. याचा राग येवून उपाध्यक्ष माळी यांनी दिलिप नाईक यांना तू काय गावचा पुढारी झाला आहे का असे म्हणत माळी यांच्यासह इतर तिघांनी नाईक यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

तुझा दुसरा हात तोडून टाकून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. नाईक यांच्यावर नगरच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिलिप नाईक यांच्या फिर्यादिवरुन राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब माळीसह गणेश माळी, प्रतिक जाधव व प्रकाश पवार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.