अकोल्यात विवाहित महिलेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अनैतिक संबंधांचा आरोप करीत विनाकारण बदनामी केली. ती सहन न झाल्याने सुनंदा भाऊसाहेब पथवे (वय २२) या विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हाळुंगी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. 


याप्रकरणी दाम्पत्याविरूद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की सुनंदा पथवे हिचे वडील कैलास बारकू उघडे यांनी अकोले पोलिसांत तक्रार दिली आहे.

Loading...
यावरून अकोले पोलिसांनी सुनिता सुभाष अस्वले व तिचा पती सुभाष तुळशीराम अस्वले यांच्याविरूद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. सुभाष अस्वले फिर्यादीच्या मुलीची विनाकारण बदनामी केली. ती तिला सहन न झाल्याने तिने त्रासाला व जाचाला कंटाळून विषारी किटकनाशक सेवन करून आत्महत्या केली.

असे फिर्यादीत म्हटले आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.