आमदार मोनिका राजळे यांची हुकूमशाही संतापजनक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार मोनिका राजळे यांची हुकूमशाही संतापजनक आहे. आगामी काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे सैनिक अशी हुकूमशाही पायदळी तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. ऊस तोडणीकामगारांसाठी आयुष्य वेचणाऱ्यांनाही आमदारांच्या समर्थकांनी अपमानित केले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे यांनी दिला. 


खरवंडी कासार येथे सोमवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत तोडणी कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याची तारीख ठरवण्यापासूनच भाजपांतर्गत नवे-जुने अशी गटबाजी उफाळून आली. मुंडे यांच्या सभेच्या गर्दीवरूनही तोडणी कामगारांचे नेते संतप्त झाले. 

Loading...
खरवंडी परिसरात जे फ्लेक्सवर राजळेंची फोटो नव्हते ते फ्लेक्स विद्रूप करून कार्यकर्त्यांनी आगीत तेल ओतले. राजळे समर्थकांनी अखेरच्या दिवशी कार्यक्रमावर ताबा घेऊन त्याला स्वतःभोवती फिरते ठेवले, असा आरोप मुंडे समर्थकांनी सभास्थानी जाहीर बोलून दाखवला. 

याबाबतच्या निवेदनात गर्जे यांनी म्हटले आहे की, सभा सुरू होण्यापूर्वी सभास्थानी राज्यातून अनेक मोठे नेते आले माजी आमदार गोविंद केंद्रे व केशव आंधळे खासदार दिलीप गांधी, संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब बांगर आदींना तोडणी कामगारांसंदर्भात विचार मांडण्याची इच्छा होती. पंकजा मुंडे येण्यापूर्वी कोणालाही बोलायला मिळू नये म्हणून आर्केस्ट्रा आयोजित केला.
राजळेंच्या शाळेचा एक कर्मचारी खासगी कार्यक्रम असल्यासारखे मनमानीपणे संयोजन करत होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्यावर पुस्तक प्रकाशनाला संयोजकांनी जाणीवपूर्वक टाळले. संयोजकांनी घोषणा टाळली, तरी माणिक खेडकर, नागनाथ गर्जे राहुल कारखेले यांनी प्रकाशन उरकून घेतले. तोडणी कामगारांचा मेळावा असूनही स्थानिक अध्यक्ष व पदाधिकारी यांना बोलू दिले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.