माजीमंत्री पिचड यांच्या मालमत्तेची चौकशी,गुन्हे नोंदवण्याच्या मागणीसाठी उपोषण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या व सक्त वसुली संचालनालय (ईडी) मार्फत करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य डाॅ. किरण लहामटे यांनी मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. 

Loading...
अकोले तहसीलबाहेर डाॅ. लहामटे यांनी उपोषण केले. या लाक्षणिक उपोषणास जिल्हा परिषद सदस्य व गटनेते जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती यमाजी लहामटे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय देशमुख, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मारुती लांघी, आदिवासी विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके, वाळू भवारी, बजरंग दलाचे भाऊसाहेब चव्हाण, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, कैलास पोरे, संतोष भांगरे यांनी पाठिंबा दिला. 

डाॅ. लहामटे म्हणाले, पिचड यांनी मंत्रिपदाचा दुरूपयोग करून आदिवासी समाजावर अन्याय केला आहे. इतरांच्या बाबतीत आदिवासी समाजातील घुसखोरी करण्यावरून कांगावा करणाऱ्या पिचड हेच आदिवासी समाजात घुसखोरी करण्याच्या गंभीर गुन्ह्यात सहभागी आहेत. 

पिचड व लाभार्थी महिला यांच्यावर अवैध मार्गाने मिळवलेल्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सक्त संचालनालयाच्या (ईडी) मार्फत चौकशी करून तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मी व माझे समर्थक महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी (२ आॅक्टोबर) अकोले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसलो आहोत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.