खासदारपुत्र सुवेंद्र गांधींवर कारवाईची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील ‘क्लेराब्रुस’ पटांगणाचा वाद उच्च न्यायालयात आहे. सदर पटांगणातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवून कोणतीही कामे कोणीही करू नये, असा मनाई आदेश असतांनाही भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या सांगण्यावरून एका व्यक्तीने जेसीबीद्वारे बेकायदेशीरपणे काम सुरू केले. 
Loading...

त्यांना साथ देणाऱ्या स्वयंघोषित ट्रस्टींसह मनाई आदेश डावलणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. चंद्रकांत उजागरे व प्रवीण वाघमारे यांच्यासह समाजाच्या नागरिकांनी सोमवारी यासंदर्भात निवेदन देऊन घोषणाबाजी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी भाजपच्या नगरसेवकांनी परस्पर त्या नियमांचे उल्लंघन करून मैदानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात येथील तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.