विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. 

नगर-नाशिकच्या पुढाऱ्यांसह जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन आणि राज्य सरकार हे कमकुवत, माहिती नसलेला वकील उभा करून मराठवाड्याच्या विरोधात भूमिका घेऊन अन्याय करत आहेत.

Loading...

राज्य सरकारने या प्रकरणात सक्षम व अभ्यासू वकिलाची नियुक्ती केली असती तर ही वेळच आली नसती. आता पुढील सुनावणीवेळी राज्य सरकारने सक्षम, अभ्यासू आणि परिपूर्ण माहिती असलेला वकील नियुक्त केला नाही तर वर्षा बंगल्यासमोर उपोषणास बसू, असा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.