तिसऱ्या मजल्यावरून पडून गर्भवती महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डीतील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून गर्भवती माता आणि तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नेमकी ही दुर्दैवी घटना घातपात की, आत्महत्या? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वैशाली साईदास शिंदे (वय २६) आणि मुलगा अथर्व साईदास शिंदे (वय ३) असे मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकाचे नाव आहे.
Loading...

दरम्यान, आमच्या मुलीचा सासरच्या लोकांनी घातपात केला असल्याचा आरोप मुलीचे वडील रामनाथ दशरथ सगर यांच्यासह माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवार दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास शिर्डीतील गणेशवाडी भागात राहणाऱ्या वैशाली साईदास शिंदे तसेच तीन वर्षांचा मुलगा अथर्व शिंदे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.

ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेचे माहेर लोणी येथील असून पती साईबाबा संस्थानमध्ये नोकरीस आहे. याबाबत माहेर कडील नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आमच्या मुलीचा मृत्युस सासरकडील नातेवाईक जबाबदार असल्याचा आरोप करत पोलीसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे,दरम्यान, महिलेचा पती स्वत:हून पोलिसात हजर झाला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.