संगमनेरच्या 'युटेक शुगर'ने पैसे थकविले ,शेतकरी चिंतेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- २०१७-१८ या हंगामातील उसाचे पेमेंट संगमनेर तालुक्यातील यूटेक शुगरने थकवल्याने जेऊर हैबती व तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मार्च, एप्रिल महिन्यात गेलेल्या उसाचे काही शेतकऱ्यांना प्रतिटन १८०० रुपयेच मिळाले. 

यासंबंधी ऊसउत्पादक दिगंबर रिंधे यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. एप्रिल महिन्यात गेलेल्या उसाचे पैसे काही शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा कमी मिळाले, तेदेखील गाळपानंतर तब्बल ६-७ महिन्यांनी. त्यासाठी हेलपाटे मारावे लागले. 


Loading...
आता उर्वरित रक्कम व साखर संघाच्या नियमानुसार व्याजासह पैसे मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कारखाना प्रशासन, अध्यक्ष यांच्याशी शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क साधला. उद्या पेमेंट करतो, परवा करतो म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे कोणाकडे न्याय मागावा, या चिंतेत शेतकरी आहेत.
----------------------------
Powered by Blogger.