नगर-मनमाड राज्य महामार्गाजवळ कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड राज्य महामार्गालगत साकुरी हद्दीतील शिरकांडे वस्तीनजीकच्या ओढ्यात कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. 


Loading...
कुजलेला मृतदेह हलवणे शक्य नसल्याने पोलिसांनी रविवारी रात्रभर दोन होमगार्ड बंदोबस्तासाठी ठेवले होते. साकुरी शिवारातील साई क्रिएशन फोटो फ्रेम दुकानासमोर असलेल्या ओढ्यात रविवारी सायंकाळी अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. 

या मृतदेहाची प्रचंड दुर्गंधी सुटली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी हा मृतदेह या जागी पडून असावा, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची अवस्था बिकट असल्याने डॉक्टरांनी जागेवरच शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर मृतदेहाची साकुरी येथील अमरधाममध्ये विल्हेवाट लावण्यात आली. हा अनोळखी मृतदेह भिकाऱ्याचा की, अन्य कोणाचा, हा प्रकार घातपात, तर नव्हे ना? असे एक ना अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.