महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करून तिला पळविण्याचा प्रयत्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाविद्यालयातून घरी जात असलेल्या तरुणीचा विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. भिंगार येथे शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध मारहाण करणे, विनयभंग करणे आदी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 
Loading...

पीडित २१ वर्षीय तरुणी नगरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. शनिवारी ती महाविद्यालयातून घरी जात होती. सैनिकनगरमधील एका चौकातून जात असताना एकाने तरुणीचा हात धरून तिला चारचाकी गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. 


त्यानंतर घरी गेलेल्या तरुणीच्या घरात घुसून मारहाण करून शिवीगाळ करून घरात तोडफोड करण्यात आली. तरुणीच्या फिर्यादीवरून राकेश लोखंडे, रिंकू शेलार व इतर पाच असे सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.