काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये राडा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नांदेडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये राडा झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचा ठराव मांडण्यास शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला. 


Loading...
त्यामुळे संतापलेले काँग्रेसचे आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोरच शिवसेना आमदारांना भिडले. दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. काँग्रेस आमदार अमर राजूरकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्काबुक्की झाली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.