चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचा वापर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोकशाही शासन प्रणालीत चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचा वापर करून पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने राष्ट्रीय मतदान कावा चळवळीस प्रारंभ करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत या चळवळीची घोषणा करुन, भ्रष्ट मार्गाने मते विकत घेऊन दारू, गुंडगिरी व पैशाच्या जोरावर निवडून येणार्‍या उमेदवारांना शुन्य मतांजली वाहण्यात आली.
Loading...

यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, जालिंदर चोभे मास्तर, काजल सुतार, लीला रासने, किशोर मुळे, लता शिंदे, बेबी दहिहंडे, सोनाली तोरडमल, सविता बोरुडे, लता गवळी, अंबिका जाधव, वंदना रोडगे, शोभा चोभे, उदय सोसाळकर, गंगुबाई कोल्हाळ, फरिदा शेख, शारदा गायकवाड, सुनील जोमदे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सर्वसामान्यांची आश्रू न पुसता भ्रष्ट राजकारणी स्वत:ची घरे भरण्यातच मश्गुल आहेत. राजकारण हा एक धंदा झाला असून, पैश्यातून सत्ता व पुन्हा सत्तेतून पैसा ही रीत बनली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व गरिबांच्या प्रश्‍नांची जाणीव भ्रष्ट राजकारण्यांना राहिली नसून, इंग्रजांपेक्षा अधिक पटीने दु:ख सोसण्याची वेळ राजकारण्यांनी सर्वांवर आनली आहे. 

सर्व प्रश्‍नांची समस्या सत्तालोभी भ्रष्ट राजकारणी आहेत. जातीच्या जोरावर मतदारांना भावनिक साद घालणे, मते खरेदी करणे यातून धनदांडगे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहे. याला सर्वसामान्य भोळेभाबडे मतदार बळी पडत आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा हा एकच उपाय आजच्या लोकशाही वाचविण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याची भुमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली.

भ्रष्ट राजकारण्यांना निवडणुकीतून हद्दपार करुन राष्ट्रहितासाठी चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी राष्ट्रीय मतदान कावा तंत्राचा प्रचार-प्रसार करुन केला जाणार आहे. सरकारने साडेचार वर्ष घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेचे गाजर दाखविले. शिर्डीला ई गृहप्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतांचे राजकारण करून घरकुल वंचितांच्या डोळ्यात धूळफेक केली. 

तसेच नवीन महामंडळाची घोषणा करून सरकारने लबाडीचा प्रयोग सुरु केला आहे. घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास याचे दुष्परिणाम सत्ताधार्‍यांना पुढील निवडणुकीत दिसून येणार असल्याचा इशारा अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिला. तर हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविता येणार असल्याची भावना व्यक्त केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.