हाताच्या नसा कापून धबधब्यात उडी घेत प्रेमी जोडप्याची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  हाताच्या नसा कापून महाबळेश्वर मध्ये धबधब्यावरून उडी घेऊन पर्यटक जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. 

दोघांचे मृतदेह तीनशे फूट दरीतून बाहेर काढण्यात आले असून यातील तरुण श्रीगोंद्यातील असून तरुणी पुणे जिल्ह्यातील आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू आणि आधार कार्ड आपले सापडले आहे.हे जोडपे बुधवारपासून बेपत्ता होते 

Loading...

श्रीगोंदा तालुक्यातील अविनाश अशोक शिर्के (वय 26) व पुण्यातील प्रियंका शिंदे (वय 27 रानऱ्हे, जि पुणे) या प्रेमी युगलांनी लग्नाला घरचे तयार होणार नाहीत म्हणून महाबळेश्वर येथील एका धबधब्याच्या 300 फूट खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली. 

या दोघांचे वडील सैन्यदलात बंगलोर येथे असल्यापासून शालेय जीवनापासूनच अविनाश आणि प्रियंका यांचे सूत जुळले होते मात्र प्रियांकाचे दुसऱ्या कोणासोबत लग्न लावून दिले त्यानंतरही अविनाश आणि प्रियंका यांचे प्रेमसंबंध कायम राहिले होते. 

शुक्रवारी दोघे पुण्यावरून एका खाजगी टॅक्सी भाड्याने करून महाबळेश्वर येथे गेले होते टॅक्सीवाल्याने त्यांना सकाळी सोडले पण दुपारी चार वाजेपर्यंत माघारी आले नसल्याने चौकशी केली असता टॅक्सीवाल्याने महाबळेश्वर पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस आणि त्यांनतर स्थानिकांनी शोध घेतला त्यावेळी दोघांचे मृतदेह आढळून आले. सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.