लोकप्रतिनिधींच्‍या नाकर्तेपणामुळे दुष्‍काळी परिस्थितीला सामोरे जाण्‍याची वेळ - डॉ.सुजय विखे पाटीलअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ.सुजय विखे पाटील यांनी तालुक्‍यातील दुष्‍काळी पट्ट्यातील ग्रामस्‍थांशी थेट संवाद साधला. त्‍यांच्‍या समस्‍या जाणुन घेतानाच या प्रश्‍नांसाठी पाठपुरावा करुन, मार्ग काढण्‍याचा दिलासा त्‍यांनी दिला. डॉ.सुजय विखे पाटील यांनी थेट पारावरच जावुन ग्रामस्‍थांशी साधलेला संवाद लक्षवेधी ठरला आहे. 

Loading...
करंडी आणि कान्‍हुर पठार येथेही विविध विकास कामांचा शुभारंभ केला. दक्षिण भागातील वीज विलाच्‍या कारणाने बंद पडलेल्‍या पाणी योजना सौर उर्जेच्‍या माध्‍यमातुन पुन्‍हा सुरु करणार असल्‍याचे आश्‍वासन डॉ.विखे पाटील यांनी दिली.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी दुस-यांदा पारनेर तालुक्‍यातील आपल्‍या दौ-याला सुरुवात केली. तालुक्‍यातील करंदी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला. याप्रसंगी ग्रामस्‍थांशी संवाद साधताना डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, राजकारणापेक्षा विखे पाटील परिवाराने समाजकारणाला प्राधान्‍य दिले. खोटे बोलून आम्‍ही कधीही लोकांशी दिशाभुल केली नाही. 


या भागातील लोकप्रतिनिधींना वर्षानुवर्षे तुम्‍ही निवडुन देत आहात पण एकही प्रश्‍न सोडविलेला नाही. प्रश्‍न सोडविण्‍यासाठी नियोजन केले नाही. या भागातील गावांची नावे देखिल या लोकप्रतिनिधींना माहीती आहे की, नाही असा प्रश्‍न पडतो. दुष्‍काळी परिस्थितीला सामोरे जाण्‍याची वेळ केवळ लोकप्रतिनिधींच्‍या नाकर्तेपणामुळे आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

याप्रसंगी सभापती राहुल झावरे, तालुका अध्‍यक्ष भास्‍करराव शिरोळे, पंचायत समिती सदस्‍य दिनेश बाबर, सरपंच नामदेवराव ठानगे, उपसरपंच भास्‍करराव गव्‍हाने, युवक कॉंग्रेस अध्‍यक्ष किरण ठुबे, जेष्‍ठनेते कोंडीभाऊ ठानगे, माजी सरपंच छोंडीभाऊ ठानगे, खादी ग्रामोउद्योगचे सदस्‍य शरद गोरे, खरेदी विक्री संघाचे संभाजी रोहकले यांच्‍यासह ग्रामस्‍थ, महीला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.

गोरेगाव येथे डॉ.सुजय विखे पाटील यांनी पारावर उभे राहुनच ग्रामस्‍थांशी संवाद साधला. दुष्‍काळी परिस्थितीबाबत त्‍यांनी माहीती जाणुन घेतली. ग्रामस्‍थांनी मांडलेल्‍या समस्‍या त्‍यांनी गांभिर्याने ऐकुन घेतल्‍या. उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांबाबत जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्‍या माध्‍यमातुन शक्‍य तेवढा पाठपुरावा आपण करु अशी ग्‍वाही देतानाच या गंभिर परिस्थितीत एक कार्यकर्ता म्‍हणुन आपल्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

कान्‍हुर पठार येथे झालेल्‍या विविध विकास कामांच्‍या शुभारंभा नंतर डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्‍थांशी संवाद साधला. या भागातील प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. प्रामुख्‍याने पाण्‍याचा प्रश्‍न गंभिर असुन, वीजबीला अभावी बंद पडलेल्‍या पाणी योजना सौर उर्जेच्‍या माध्‍यमातुन पुन्‍हा कशा सुरु करता येतील याचा प्रयत्‍न आपण करणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.