मुख्यमंत्री ३ नोव्हेंबरला नगरमध्ये उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 नोव्हेंबरला पारनेर तालूक्यातीळ सुपा एमआयडीसीत एका कार्यक्रमासाठी येत आहेत. याचवेळी फडणवीस यांचा नगर शहराचा दौरा निश्‍चित करून त्यांच्या हस्ते शहरातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन शहर भाजपकडून करण्यात येत आहे.
Loading...

नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मनपा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टेशन रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन मनपा निवडणूक आचारसंहितेपूर्वीच करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्र्यांनी उड्डाणपुलासाठी 52 कोटीची घोषणा नुकतीच शिर्डीत केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मनपा निवडणुकीचे रणसिंग फुंकण्याची शक्यता असून यावेळी मुख्यमंत्री फडणवीस नगर शहरासाठी विशेष पॅकेज जाहीर करणार का? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.