पाथर्डी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटात तेलाने भरलेला टेम्पो उलटून अपघात झाला. अपघातानंतर जखमी चालकाला मदत करण्याऐवजी रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, करंजी गावातील ग्रामस्थ हे गोड तेलाचे ड्रम व पिशव्या चोरून नेत होते. 

Loading...
टेम्पोमधील गोडतेलाचे ड्रम, पिशव्या चोरल्या !
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शुक्रवारी साय़ंकाळी तेलाने भरलेला एक टेम्पो नगरहून पाथर्डीकडे जात होता. घाटात टेम्पो उलटून अपघात झाला. टेम्पो उलटल्याने चालक गंभीर जखमी होऊन टेम्पोत पडलेला होता. रस्त्याने जाणारे वाहनचालक अपघातस्थळी थांबत होते. मात्र, जखमी टेम्पोचालकाला मदत करण्याऐवजी हे वाहनचालक टेम्पोमधील गोडतेलाचे ड्रम, पिशव्या चोरत होते. 

मदत करन्याएवजी मोटारसायकलवरून तेल चोरण्यासाठी...  
या गावातील ग्रामस्थांना ही माहिती मिळाल्यानंतर काही जण मोटारसायकलवरून तेल चोरण्यासाठी आले. ही माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलिस अपघातस्थळी आले. तोपर्यंत तेल चोरण्यासाठी आलेले लोक पसार झाले होते. त्यानंतर जखमी वाहनचालकाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमी चालकाचे नाव उशीरापर्यंत समजू शकले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.