अंघोळीसाठी नदीपात्राकडे गेलेल्या ३ मुलांचा प्रवरेत बुडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रवरा नदीपात्रात तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात आज सकाळाच्या सुमारास घडली. समर्थ दीपक वाळे (वय 10), रोहित चंद्रकांत वैराळ (वय 11), वेदांत ऊर्फ बाळा विनोद वैराळ (वय 9, तिघेही रा. मंगळापूर, ता. संगमनेर) असे मृत बालकांची नावे आहेत.
Loading...

दरम्यान, सकाळच्या वेळी तिघेही बालके अंघोळीसाठी नदीपात्राकडे गेले होते. सध्या प्रवरेला शेतीसाठीचे आवर्तन सुरु आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असता तिघेही नदीपात्रात बुडाले. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. मात्र त्यापूर्वीच तिघेही बुडाले होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.