शिवसेनेचे 'ते' नेते तडजोडी करण्यात माहीर - आ.कर्डिले.

                     

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जायकवाडीला पाणी सोडण्याचा शासनाचा निर्णय झाला, म्हणून आमदाराला घाटाखाली येऊ देऊ नका, अशी ओरड करणारे शिवसेनेचे खेवरे तडजोडी करण्यात माहीर अाहेत. गेल्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट दुसऱ्याला कसे दिले गेले, हे जनतेला माहिती अाहे. 


Loading...
तुम्ही निष्क्रिय ठरल्याने जनतेने मला दोनदा निवडून दिले. माझे घाटाखाली येणे हे जनतेच्या हाती आहे. तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही. अश्या शब्दांत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

चिंचाळे फाटा, मल्हारवाडी घाट ते मल्हारवाडी खिंड या १ कोटी १८ लाख खर्चाच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाला प्रारंभ करताना कर्डिले बोलत होते.  निळवंडे कालव्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. दिलेला शब्द पूर्ण करूनच अागामी निवडणुकीत मते मागण्यासाठी येणार असल्याचे आमदार कर्डिले यांनी सांगितले. 

२००५ मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला. त्यावेळी कुठलाही विरोध न करणारे पुढारी आज जायकवाडीला पाणी सोडू नये म्हणून रास्ता रोको आंदोलन छेडत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटी सहानुभूती मिळवण्याचा हा खटाटोप अाहे, अशी टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.