महेंद्रसिंग धोनी टीम इंडियातून बाहेर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वेस्ट इंडिज आणि आॅस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी-२० मालिकेतून महेंद्र सिंग धोनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Loading...
वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवशीय सामने सुरू आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्याच्या या मालिकेमध्ये धोनीला स्थान देण्यात आलं नाही.

धोनी पाठोपाठ कर्णधार विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहेत.

तसंच या मालिकेसाठी ऋषभ पंतने कमबॅक केलंय. दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पांड्या वाशिंग्टन सुंदर आणि शाबाज नदीम या खेळाडूंना संधी देण्यात आलीये.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.