वर्गमैत्रिणींची हत्या करून त्यांचे रक्त पिण्याचे व आत्महत्येचे षड्यंत्र.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील बारटो भागातील एका शाळेत दोन विद्यार्थिनींनी इतर वर्गमैत्रिणींची हत्या करून त्यांचे रक्त पिण्याचे व आत्महत्येचे षड्यंत्र रचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुदैवाने शाळा प्रशासन व पोलिसांच्या सतर्कमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 


Loading...
वर्गमैत्रिणींची हत्या करण्यासाठी मंगळवारी ११ ते १२ वर्षांच्या दोन विद्यार्थिनी धारदार चाकू घेऊन शाळेत आल्या. बाथरूमध्ये लपून आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या इतर वर्गमैत्रिणींची हत्या करण्याचे या दोन विद्यार्थिनींनी नियोजन केले होते. 

मैत्रिणीच्या हत्येनंतर या दोघी स्वत: आत्महत्या करणार होत्या. मात्र, या दोन्ही मुली वर्गात न पोहोचल्यामुळे शाळा प्रशासनाने शोधाशोध सुरू केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.