शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आ.शिवाजी कर्डिलेना गाव बंदी केली पाहिजे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पाणी गेल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल, अशी भाषा करणाऱ्या व मुळा धरणाखालील लाभधारक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आ.शिवाजीराव कर्डिले यांना गाव बंदी केली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला.
Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले. 

नगर-मनमाड राज्य मार्गावरील बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ तालुक्यातील भाजप वगळून सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा जो सरकारने निर्णय घेतला त्यास विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.