पुढच्या वर्षात शेतकऱ्यांना येणार 'अच्छे दिन' !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम नुकताच पार पडला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 

Loading...
पुढील वर्षीसाठी शेतीचे भाकित चांगले वर्तविल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. लक्ष्मीला पिडा असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगताना भगत भुसारे म्हणाले की, दाही खंडामध्ये रक्ताचा पुर वाहणार म्हणजे युध्द किंवा नैसर्गिक संकट ओढवणार. लक्ष्मीला पिडा असून, बाळाला संकट नाही. पाच खंडामध्ये चित्ता सवातीचा पाऊस तर दिवाळीचा दिपान व सटीचा सटवान पाऊस होईल. 

जेठुडी साधन, गायी देठाला लागून, नवीन तूप होणार असल्याची भविष्यवाणी सांगत, शेतकर्‍यांना पुढच्या जेठुडीला चांगले दिवस येण्याचे भाकित त्यांनी वर्तविले. तसेच आषाढी साधन मध्ये पाऊस होऊन ज्वारी, बाजरी, गहू, हरबरा यांची पेर होणार असल्याचे सांगितले.

भुसारे यांनी मागील वर्षी सांगितलेले भाकित यावर्षी खरे ठरल्याने भविष्यवाणी ऐकण्यासाठी निमगांव वाघा, चास, पिंपळगाव वाघा, जखनगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने आदि पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.